ताज्या बातम्या

देश आणि विदेश

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मोदीसरकारविद्यार्थ्यांसाठीहीशाप; NEET पेपरफुटीमुळे२३लाखविद्यार्थ्यांच्यास्वप्नांचाचुराडा – प्रा. वर्षागायकवाड

प्रतिनिधी : मोदी सरकारने तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन फसवले, नोकर भरती केली नाही. परीक्षा देऊन भविष्य उज्वल करु पाहणाऱ्या लाखो मुलांच्या स्वप्नावरही सातत्याने पाणी फेरण्यात आले. आता NEET परीक्षेचा पेपर फुटल्याने २३ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांचा चुराडा आणि विश्वासघात केला. मोदी सरकार विद्यार्थांसाठीही शाप ठरले आहे असा घणाघाती हल्ला करत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करण्याची काँग्रेसची गॅरंटी आहे, असा विश्वास मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदी सरकारने १० वर्षांत विद्यार्थ्यांसाठी काहीही केलेले नाही. मोदी सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत आजचा तरुण वर्ग चुकवत आहे. शिक्षण क्षेत्रालाही धार्मिक रंग देण्याच्या नादात भाजपा सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा केला आहे. उत्तर प्रदेशात पोलीस भरतीचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले, या आंदोलनाला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला शेवटी जनतेचा रोष लक्षात घेऊन योगी सरकारला नमते घ्यावे लागले. महाराष्ट्रातही तलाठी भरतीचा पेपर फुटला असताना गृहमंत्री फडणवीसांनी मात्र तपास करण्याऐवजी पुरावे मागण्याचा निर्लज्जपणा केला. भाजपा सरकारमुळे तरुण पिढीचे अतोनात नुकसान झाले आहे. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा बनवून करोडो प्रामाणिक तरुणांचे भविष्य वाचवण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. आज सकाळी महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भूषण पाटील यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी वाकोला, सांताक्रुज पूर्व येथील व्यापारी व स्थानिक रहिवाशी यांच्याशी संवाद साधला. कलिना विधानसभा मतदारसंघात रामदास चौक ते मॅच फॅक्टरी तसेच कुर्ला विधानसभा मतदारसंघातील पंचशील नगर ते पंढरीनाथ सेवा मंडल अशी जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राहुल शेवाळे यांनी घेतला पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आशीर्वाद        रेवदंडा येथील निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

प्रतिनिधी  : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बुधवारी सकाळी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री, महाराष्ट्र भूषण

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अवयवदान वाढणे ही काळाची गरज – राजीव निवतकर

प्रतिनिधी(रमेश औताडे) : कोणत्याही ठिकाणी असूद्या प्रतीक्षा यादी असतेच. आरोग्य विभागही त्याला अपवाद नाही. आपले अवयव किती अनमोल असतात याची

देश आणि विदेश, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

संविधान बदलण्याची तयारी सुरू आहे – तुषार गांधी

प्रतिनिधी(रमेश औताडे) : सामान्य माणसाला गुलाम केले आहेच.आता संविधान बदलण्याचे काम सुरू आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी गांभीर्याने

कोल्हापूर, देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी, सांगली, सातारा

मतदानाला जाताना तुमचा मोबाइल घरीच ठेवा ! फोन सापडल्यास गुन्हा नोंदवणार : निवडणूक प्रक्रियेत बाधा येण्याची भीती

मुंबई: लोकसभा निवडणुकीची थामधूम सुरू झाली आहे. मतदानासाठी मतदान केंद्रांवर जाताना काही गोष्टींची काळजी मतदारांनी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, व्हायरल बातम्या

वर्षा गायकवाड यांचा जनतेशी भेटी व संवादावर भर, पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

 प्रतिनिधी : काँग्रेस इंडिया आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. दररोज

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, व्हायरल बातम्या

ठाण्यातील रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला

ठाणे : बारावीच्या आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग

कोल्हापूर, देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, संपादकीय

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज !

          आज ६ मे, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १०२ वि पुण्यतिथी. आजच्याच दिवशी १९२२

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या धारावीतील निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

प्रतिनिधी : लोकसभा दक्षिण मध्य मुंबई मतदार संघाचे उमेदवार अनिल यशवंत देसाई यांच्या धारावीतील निवडणूक कार्यालयाचे उदघाटन धारावीतील सर्व प्रमुख

महाराष्ट्र, देश आणि विदेश, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, सातारा

श्री. छ. खा. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज -श्रीमंत कोकाटे , डॉ मच्छिंद्र सकटे

सातारा : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखा सच्चा पुरोगामी व

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top