ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

शेवाळेवाडीत बिबट्याचा दुचाकी वरील मुलीवर हल्ला

कराड (प्रतिनिधी ) : उंडाळे शेवाळ वाडी ता. येथे रविवारी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घालत पाच ते सहा दुचाकींचा चा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या शेळकेवाडी येथील मुलीवर बिबट्याने झेप टाकत हल्ला केला .या हल्ल्यात मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. बिबट्याच्या धुमाकूळा मुळे शेवाळवाडी उंडाळे ,सवादे, बांदेकरवाडी ,महासोली येथील ग्रामस्थ भीतीने घाबरून गेले आहेत ,या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी अनेकदा मागणीही केली आहे परंतु वन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे, रविवार दिनांक 13 रोजी बिबट्या कडून वाहनांचा पाठलागाचे सत्र दिवसभर सुरू होते सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी उंडाळे शेवाळेवाडी येथे बिबट्याने पहाटे सदाशिव शेवाळे यांच्या घरात शिरून त्यांचे पाळीव कुत्रे फस्त केले ,उंडाळे शेवाळवाडी दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कडेला वस्तीजवळ लपून बसत या परिसरातून जाणाऱ्या चार ते पाच दुचाकींचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ले केले,यावेळी शेळकेवाडी येथील दुचाकी वर पाठीमागे बसलेले लहान मुलीवर झेप टाकली. बिबट्यांची नखे लागल्याने मुलगी जखमी झाली आहे. बिबट्याने सदाशिव शेवाळे यांचे घर टार्गेट केले सायंकाळी त्यांच्या घरात पुन्हा प्रवेश करून दारात बांधलेली शेळी ठार केली गेल्या अनेक दिवसापासून बिबट्या सातत्याने शेवाळेवाडी परिसरात जनावर हल्ले करणे ,पाळीव ,व भटके कुत्र्यावर हल्ला करून ती फस्त करणे हा नित्यक्रम सुरूच आहे बिबट्याच्या सातत्याच्या हल्ल्याने व दर्शनाने शेतकरी वर्ग पुरता धास्तावला आहे, असे असताना वन विभाग मात्र बिबट्याच्या बंदोबसाठी काही हालचाल करताना दिसत नाही त्यामुळे वन विभागाच्या कृतीवर ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top