ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम; बुद्ध वंदना, लाडू वाटप व सह्यांची मोहीम 

ारावी : प्रज्ञा प्रतिष्ठान व प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बुद्ध वंदना, लाडू वाटप, तसेच ‘बौद्धगया महाविहार कायदा १९४९ रद्द करावा’ या मागणीसाठी सह्यांची भव्य मोहीम राबविण्यात आली.

या कार्यक्रमाला आमदार डॉ. ज्योतीताई गायकवाड, धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजू बिडकर, माजी आमदार बाबुराव माने, धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक राजू कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धारावी तालुका अध्यक्ष उल्लेश गजाकोश, मनसेचे संदीप कदम व संदीप कवडे, जिगर मोरे, शिवसेनेचे विठ्ठल पवार, किरण काळे, आनंद भोसले, धगधगती मुंबई चे संपादक भीमराव धुळप, तसेच संस्थेचे अध्यक्ष आयू.अनिल शिवराम कासारे, सरचिटणीस नितीन दिवेकर, कार्याध्यक्ष गौतमी जाधव, संजीवन जयस्वाल व विनीत कासारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांचे विचार जनमानसात पोहोचवण्याचा संकल्प केला व बौद्ध समाजाच्या न्यायहक्कासाठी एकत्रितपणे लढण्याचे आवाहन करण्यात आले.

Scroll to Top