ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

सातारा जि प वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ उद्या शुक्रवारी

सातारा(अजित जगताप ) : सातारा जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव निमित्त दिनांक १० ते१२ जानेवारी या कालावधीमध्ये विविध स्पर्धा होत आहे .या स्पर्धेचे उद्घाघाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होत आहे. सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी सातारा जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी वर्ग सध्या सराव करण्यामध्ये गुंतलेले आहेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रोत्सानामुळे अनेक सातारा जिल्हा परिषद कर्मचारी खेळाडू मोठ्या जोमाने सराव करत आहेत. अगदी टपाल विभागापासून ते सर्वच विभागात सध्या कर्मचारी वर्ग स्पर्धेच्या बाबतीत जागृरकपणे सराव करत आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनातील ताण तणाव कमी करण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरत असून या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील प्रमुख मंत्री खासदार आमदार व प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती लक्ष विधी ठरणार आहे.
सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद् यांच्यासमवेतच सर्व वर्गाचे वरिष्ठ अधिकारी ,गटविकास अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील चार मंत्री, तीन खासदार ,चार आमदार त्याचबरोबर विधान परिषद सदस्य यांची उपस्थिती यामुळे खेळाडू व कर्मचारी व्यतिरिक्त या ठिकाणी पक्षीय कार्यकर्ते व सातारा जिल्हा परिषदेमध्ये सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..
……………………………
फोटो -जिल्हा परिषद कर्मचारी सराव करताना नेमका कबड्डीच्या सराव मध्ये एकमेकांचे पाय वाढताना (छाया- अजित जगताप सातारा)

Scroll to Top