ताज्या बातम्या

विनायक खानविलकर पुन्हा बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्षपदी विराजमान; अभ्यासु व न्यायी व्यक्तिमत्वामुळे तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड

मुंबई (शांताराम गुडेकर /दिपक मांडवकर )
लांजा तालुक्यातील खानवली ग्रुप ग्रामपंचायत येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्री विनायक जयवंत खानविलकर यांनी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. या गावातील मागील काळ पाहता या पूर्वी देखील श्री. विनायक खानविलकर हे तंटामुक्ती अध्यक्ष होते. त्या वेळी प्रामुख्याने गावातील गोर गरिबांच्या अन्यायासाठी उभे राहून न्यायदेणारे व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला होते. त्या शिवाय गावातील विकासाठी घटनात्मक पद्धतीने परिवर्तनाचा पाया देखील यांनी त्याच वेळी उभारला होता. जनसेवा आणि खास करून अभिनयाने स्वतःच्या नावा साठी गावाचेही नाव रोशन करून राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. आणि याच्या कर्तृत्वाच्या बळावर यांची नियुक्ती करण्यात आली असे सांगण्यात आले.त्यांच्या या निवडीमुळे खानवली गावाच्या सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या योगदानाला आणखी एक महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.
गावातील सामाजिक सलोखा, शांतता, एकोपा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी तंटामुक्त समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आणि गावातील विविध प्रश्न व मतभेद संवाद, समन्वय आणि सामंजस्याच्या माध्यमातून सोडविण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरते. म्हणून पुन्हा श्री. विनायक खानविलकर यांच्या खांद्यावर आली असून, आपल्या अनुभवातून आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या भूमिकेतून ते ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक एकजूट अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर खास करून पंचायत समिती सदस्य यशवंत वाकडे यांनी बोलताना सांगितलं की, अभिनय क्षेत्रात काम करत असताना तालुक्याचं नाव पुढे नेल व विशेष अभिनंदन केले. आणि ग्रामस्थांच्या वतीने देखील शुभेच्छा वर्षाव करण्यात आला.

Scroll to Top