ताज्या बातम्या

कृष्णा कॅनलवरील बॅनर बघतोय अपघाताची वाट!

कराड : कृष्णा कॅनल परिसरातील रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला मोठा जाहिरात बॅनर सध्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्याच्या अगदी कडेला उभारण्यात आलेल्या या बॅनरमुळे पादचारी व वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून, वाऱ्यामुळे बॅनरचा भाग रस्त्याकडे झुकलेला दिसत आहे.
पावसाळ्यात रस्ता ओला असताना वाहनचालकांना अधिक काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला उभारलेले मोठे आणि अस्थिर बॅनर अचानक रस्त्यावर आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जाहिरातदारांनी आणि संबंधित प्रशासनाने अशा बॅनरची तातडीने पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे किंवा धोकादायक बॅनर हटवावेत, अशी मागणी होत आहे.
“बॅनरमधून जाहिरात होण्याऐवजी अपघाताची बातमी होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रस्ते सुरक्षित ठेवणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असून, दुर्घटना घडण्यापूर्वीच धोकादायक बॅनरवर कारवाई करण्याची गरज आहे.

Scroll to Top