मुंबई : धारावी विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने धारावी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या फॅसिलिटीज मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून विविध पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हा रोजगार मेळावा शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. नोकरीच्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे :
१) रेशन कार्ड – मूळ प्रत व २ झेरॉक्स प्रती
२) लिव्हिंग सर्टिफिकेट – मूळ प्रत व २ झेरॉक्स प्रती
३) इलेक्ट्रिसिटी बिल – मूळ प्रत व २ झेरॉक्स प्रती
४) पासपोर्ट साईज फोटो – ५ प्रती
५) आधार कार्ड / मतदान ओळखपत्र / पॅन कार्ड / बँक पासबुक – २ रंगीत प्रती
६) डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट
७) पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट
८) फॅमिली फोटो
अधिक माहितीसाठी हंसराज लोढे – ८५९१३१३९५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.




