मुंबई : केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलतींसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजक लाभार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत पात्र नवउद्योजकांना प्रकल्पाच्या एकूण किंमतीपैकी लाभार्थ्याच्या हिश्श्याच्या २५ टक्के रकमेपैकी जास्तीत जास्त १५ टक्क्यांपर्यंत मार्जिन मनी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार असून, नवउद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ४०००७१ या कार्यालयाच्या पत्त्यावर अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२५२२२०२३ तसेच ई-मेल acswomumbaisub@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



