ताज्या बातम्या

भारताची घोडदौड थांबवणे आता अशक्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मुंबईत भव्य तिरंगा रॅली; विकसित भारताच्या संकल्पनेचा पुनरुच्चार
मुंबई : ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या रॅलीत देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अनुभवायला मिळाली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आज येथे देशप्रेमाचा महासागर उसळला आहे. या तिरंग्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, सैनिकांनी सीमेवर प्राणांची आहुती दिली आणि लाखो भारतीयांनी संघर्ष केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी फडकलेला हा तिरंगा चंद्र-सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत अभिमानाने फडकत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशाच्या प्रगतीचा उल्लेख करताना सांगितले की, पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, स्टार्टअप आणि अंतराळ संशोधन या सर्व क्षेत्रांत भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून, भारताची स्टार्टअप परिसंस्थाही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून, त्याच्या प्रगतीला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. काही परकीय शक्ती भारताची घोडदौड थांबविण्याचा प्रयत्न करत असल्या, तरी २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
तसेच त्यांनी सांगितले की, तिरंग्याचा आणि संविधानाचा सन्मान प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरू झालेली तिरंगा यात्रा ही विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारी चळवळ आहे. जसा तिरंगा देशाचा अभिमान आहे, तसाच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत आघाडीवर राहील, असेही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष , मंत्री , मंत्री , आमदार , आमदार , पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top