सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शिवजल ग्रुपतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या ‘सिंगापूर सिटी’ या १०० एकरांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात पार पडला. इस्टेट डेव्हलपर सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली साकारत असलेल्या या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात आधुनिक आणि नियोजनबद्ध वसाहती उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकल्पामध्ये एन.ए. भूखंड, १ आरके, १ बीएचके, २ बीएचके, ३ बीएचके घरे, स्वतंत्र बंगले तसेच आधुनिक पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी शिवजल ग्रुपने विकसित केलेल्या ५१ एकरांच्या ‘जग्वार सिटी’ प्रकल्पालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
शुभारंभाच्या दिवशी अनेक ग्राहकांनी भूखंड, घरे आणि बंगल्यांची बुकिंग करून प्रकल्पावर विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शिवजल ग्रुपने ठेवले असून, त्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रकल्पप्रमुख सचिन भोसले यांनी आटपाडीसारख्या ग्रामीण भागात आधुनिक शहराची संकल्पना साकारण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे सांगलीसह राज्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, भविष्यात हा प्रकल्प परिसराच्या विकासाला चालना देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




