ताज्या बातम्या

येळगाव प्राथमिक शाळेत मैत्री स. फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

कराड, दि. 18 जुलै : मैत्री स. फाउंडेशनच्या वतीने येळगाव (गवकरवाडी–मस्करवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास येळगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. अनुराधा माने, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्या सौ. वैशाली वसंत पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन अक्षय शेटे, सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन वसंत माने, तसेच गावच्या पोलीस पाटील शुभांगी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमात मैत्री स. फाउंडेशनचे सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Scroll to Top