
मुंबई : दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकालगत जुन्या फुल मार्केट परिसरातील ‘सखी जेम्स अँड ज्वेलरी’ या दागिन्यांच्या प्रसिद्ध शोरूमचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर आज मान्यवरांच्या उपस्थितीत आणि संत कृष्णदास महाराज यांच्या शुभआशीर्वादाने नव्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याला ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नव्याने सजविण्यात आलेल्या शोरूममध्ये पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचे आकर्षक संकलन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
यामध्ये मंगळसूत्र, ठुशी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, चिंचपेटी, तन्मणी, पुतळी हार, नथ, बुगडी, मुंडावळ्या, पाचा पदरी तोडे, जोडवी, पैंजण यांसह विविध पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांचे तसेच आधुनिक डिझाईन्सचे दागिने ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.
उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर करण्यात आली असून, पुढील चार दिवस प्रत्येक खरेदीवर तब्बल ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. त्यामुळे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दर्जेदार दागिने, आकर्षक डिझाईन्स आणि विशेष सवलतीमुळे ‘सखी जेम्स अँड ज्वेलरी’ हे दादर परिसरातील ग्राहकांसाठी आणखी एक विश्वासार्ह खरेदीचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




