शाहूपुरी(अजित जगताप) : स्वास्थ्य फिटनेस आयोजित वन विभाग सातारा सातारा नगरपालिका व आय.टी.आय. सातारा (राष्ट्रीय सेवा योजना विभाग) यांच्या सहकार्याने रविवार दिनांक १२ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता स्वामी समर्थ मंदिर, शाहूपुरी, सातारा या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… यामुळे खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये क्रांती घडली आहे. प्रत्येकाला तीव्र उन्हाळ्यात वृक्षाची सावली पाहिजे असते. पण, वृक्षारोपण करण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळेला सामाजिक जबाबदारीतून काम करणाऱ्या संस्थेमार्फत शाहूपुरी परिसरात वृक्षारोपण होत आहे. या वृक्षारोपणासाठी प्रसिद्ध अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते श्री सयाजी शिंदे हे उद्घाघाटन व प्रमुख पाहुणे आहेत .
या वेळेला वनरक्षक विश्वास मिसाळ, वनरक्षक एन. एच. कोळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव, सातारा नगरपालिका वृक्ष विभाग तथा पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे ,आय.टी.आय. प्राचार्य शामली पवार, पत्रकार अजित जगताप, पत्रकार प्रगती जाधव, पत्रकार विशाल गुजर , सातारा नगरपालिकेच्या नगरसेविका शारदा वाघमोडे, विमल गोसावी, नगरसेवक अक्षय जाधव, विश्वतेज बालगुडे आणि आधार जनरल हॉस्पिटलचे डॉ. कबीर मुलाणी ,हॉटेल चंद्रविलासचे प्रसिद्ध उद्योजक वसंत जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. किमान ५०० वर्षाचे रोपण होणार आहे.
या वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाची जय्यत तयारी झाली असून प्रत्येक वृक्ष जगण्यासाठी वनप्रेमी प्रयत्न करणार आहेत. अशी माहिती आयोजक आय.टी.आय. शिक्षक व उत्कृष्ट धावपटू महानवर यांनी दिली आहे. …………………………………
फोटो- वृक्षारोपण करताना सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचा प्रतिनिधिक स्वरूपातील फोटो




