ताज्या बातम्या

दिमाखात उभी सातारा नगरपरिषदेची नवी प्रशासकीय इमारत; काम अंतिम टप्प्यात

सातारा : सातारा शहराच्या प्रशासकीय व्यवस्थेला नवे रूप देणारी नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आधुनिक वास्तुरचना, प्रशस्त कार्यालये, नागरिकांसाठी सुलभ सुविधा आणि अत्याधुनिक पायाभूत सोयींनी सुसज्ज ही इमारत शहराच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
सध्या इमारतीच्या अंतर्गत सजावटीसह अंतिम स्वरूप देण्याची कामे वेगाने सुरू असून, लवकरच या इमारतीतून नगरपरिषदेचा कारभार सुरू होण्याची अपेक्षा आहे. नवीन इमारतीमुळे नागरिकांना विविध विभागांची कामे एकाच ठिकाणी अधिक सोयीस्कर आणि जलद पद्धतीने करता येणार आहेत.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार सक्षम प्रशासन उभारण्याच्या दृष्टीने ही इमारत महत्त्वाची ठरणार असून, साताऱ्याच्या विकासाला नवी दिशा देईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. आता शहरवासीयांचे लक्ष या इमारतीच्या उद्घाटनाकडे लागले आहे.

Scroll to Top