ताज्या बातम्या

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण काहींच्या ठिय्या विरोधात आंदोलनाची वेळ ….

सातारा(अजित जगताप) : गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस दलामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग हा आत्मा आहे. पूर्वी अनेक गुन्हे उघडकीस होण्यासाठी खबऱ्यांचे जाळे होते. आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील काही कर्मचारी आणि गुन्हेगार यांच्यातील आर्थिक व्यवहाराने हा विभाग बदनाम होत आहे. त्यामुळे प्रदीर्घकाळ ठिय्या मारून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यासाठी साताऱ्यात आंदोलनाची वेळ आली आहे. सक्षम यंत्रणा मार्फत तपास करावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व भारतीय स्वाभिमानी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तुषार मोतलिंग यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना याबाबत निवेदन घेऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. सातारा स्थानिक गुन्हा अन्वेषण किंवा इतर कोणत्याही पोलीस ठाण्यात तीन वर्षानंतर बदली केली जाते. गुन्हा घडल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्हे उघड करणे . सबळ पुरावा गोळा करणे.त्याचा योग्य तपास लावणे आणि गुन्हेगारांना न्यायालयात शिक्षा होण्यासाठी परिश्रम घेणे. अशी कार्यपद्धती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात पूर्वी दिसून येत होती. आता बरेच गुन्हे हे कागदोपत्री समोर येत नाही. तडजोडीचे ठिकाण हे लोक न्यायालय किंवा पोलीस ठाणे ऐवजी अनेक धाबे, हॉटेल व खासगी कार्यालयात होत आहेत. हे ऐकून होतो. आता प्रत्यक्षात याबाबत आता आंदोलनाची वेळ का आली? याचा आत्मचिंतन करणे गरजेचे आहे . एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणून दुसरा हात पुढे करावा लागतो.सातारा पोलीस यंत्रणा व सराईत गुन्हेगार यांच्याबाबतही असेच बोलले जाते. कानून के हात लंबे होते है… पण इथे हात आकुड का झाला? असा प्रश्न खाजगीत विचारला जात आहे. असे ही आंदोलकांनी स्पष्ट केले.

सातारा शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी खोटे गुन्हे, अवैध धंदेवाल्यांशी संगनमत व आर्थिक व्यवहारांचे आरोप उघडपणाने केले आहेत. काही गुन्ह्याचा कधीही शेवटपर्यंत तपास लागलेला नाही. आरोपाचे झूल घेऊनच पोलिस अधिकारी व यंत्रणेला काम करावे लागत आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखा मधील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून ठिय्या मांडून बसलेले आहेत. वरिष्ठांची मर्जी सांभाळताना इतरांवरही अन्याय होतो. पोलीस यंत्रणेमध्ये याबाबत मत भिन्नता आहे. महसूल विभागात जास्त महसूल गोळा करणाऱ्यांना जास्त संधी प्राप्त होते. पोलीस यंत्रणेमध्ये तसं काही नाही तर गुन्हेगारांवर वचक ठेवणे. हेच महत्त्वाचे असते. त्याच कामांमध्ये गळती लागलेली आहे.
त्यामुळे सातारा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची तातडीने चौकशीसह तात्काळ कार्यवाही व्हावी. अशी भारतीय स्वाभिमानी संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुषार विजय मोतलिंग यांनी करून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नाट्यमय आंदोलन छेडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांची बदली व चौकशी झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागातील गुन्हेगारांशी संबंधित काही पोलिस कर्मचाऱ्यांनी पार्टनरशिप मध्ये वेगळा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. अवैध धंदेवाल्यांशी संगनमत असून आर्थिक व्यवहार होत आहेत. यामध्ये अनेक वाटेकरी आहेत. ते कधीच पडद्या समोर येत नाहीत. उलट अशा गोष्टी लपवण्यामध्येच त्यांनी धन्यता मानली. असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी दिनांक सहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आंदोलकांनी अर्धनग्न व मुंडन आंदोलन करण्याची घोषणा केली .श्री. त्यानुसार प्रमोद काळे, महेश आवडे, सुनील कांबळे, अशोक जाधव, सागर भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आले. मात्र, अगोदरच तयारीत असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखले.यावेळी आंदोलक व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुमारे पंधरा मिनिटे शाब्दिक मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक श्री पिंगळे यांच्याशी चर्चा झाली. या आंदोलनाची दिवसभर सातारा जिल्ह्यात चर्चा रंगली होती. आंदोलकांना खाजगीत अनेकांनी भेटून आपला अनुभव कथन केला. तर काहींनी न्यायालयात या विरोधात जाण्याची ही तयारी केली असल्याचे माहिती दिली.

________________________________

फोटो – सातारा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलक व पोलिस यांच्या मध्ये शाब्दिक वाद होताना.. (छाया – अजित जगताप, सातारा)

.

Scroll to Top