ताज्या बातम्या

पराभवाच्या भीतीने साताऱ्यात उमेदवारांनी घेतला हात आखडता, पण सहली शिवाय पर्याय नाही

सातारा(अजित जगताप) : सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला व मतदानाला वेग आला असला तरी पराभवाच्या भीतीने सातारा सांगली विधानपरिषद इच्छुक उमेदवारांनी आपला हात आखडता घेतला आहे. त्यामुळे मतदारांना वाऱ्यावर सोडून गैरविश्वास दाखवणाऱ्या पक्षासाठी जबरदस्तीने काहीना सहलीला जाणे भाग पडले आहे. यावेळी काही मतदारांनी घरची मीठ भाकरी बरी असं म्हणण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सत्ताधारी पक्षातील प्रचारकांना आत्मचिंतन करण्यास सुरुवात केली आहे.

सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप आणि अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात महायुतीकडे संख्याबळ अधिक असलं तरी महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तसेच अपक्षांची भूमिका निर्णय ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य साताऱ्यातील बैठकीला उपस्थित होते परंतु त्यांनी महायुती सोबत जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे उमेदवारांच्या चेहऱ्यावरील चिंता अधिकच गडद पसरली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीने स्वाभिमानी बाणा दाखवला नाही तर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला भाजप सुरुंग लावेल. अशी समाज माध्यमावर आशियाच्या मजकूर येऊ लागलेला आहे.
. अर्थात थैलीवाल्यांचा पक्ष किती थैली रित्या करतोय? यावर बरेच अवलंबून असून अनेक मतदारांना लक्झरी लाइफ जगण्यासाठी चार दिवस कोकणात पाठवले आहे. यासाठीच त्यांना निवडून दिले आहे का? असा आता थेट प्रश्न ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मतदार संघ व नगरपालिकेच्या वार्डातील मतदार विचारू लागलेले आहेत. अर्थात सुदृढ लोकशाही लयास गेल्यानंतर असेच घडणार आहे. हे सुद्धा लोकांना अपेक्षित आहे .

सातारा सांगली निवडणुकीत मतदारांना लपवून ठेवण्याची सत्ताधाऱ्यांवर वेळ आली आहे. तर दुसऱ्या बाजूला सातारा सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात राजकीय शुकशुकाट दिसून येत आहे. घोडेबाजार दर काय दर आहे? असे विचारना होत असतानाच सत्ताधारी पक्षाने काही मतदारांना लपवून ठेवले आहे. या लपवाछपवीच्या गोष्टीला सहल असे नाव दिल्यामुळे खऱ्या अर्थाने सट्टा बाजार झालेला आहे का ? निष्ठेपेक्षा सहलीमुळे त्यांची निष्ठा अधिक गडद होणार का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी काही चाळीस-पन्नास सबस्क्राईब असलेल्या माध्यमांनी पाऊस नसतानाही तर्फे निवडणूक होण्याच्या बातम्या पेरण्याचे वारगुळा म्हणून काम केले आहे. वास्तविक पाहता निवडणुकीसाठी कोणतेही खर्चाची मर्यादा जरी नसली तरी इच्छुक उमेदवारांनी हात आखडता घेतल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंग पावले आहेत. काहींनी इमाने वाटप करण्यास सुरुवात केली असली तरी मतदार हा राजा असतो. या राजाला दरबारातल्या सुख सुविधा देण्याकडे आता लक्ष द्यावे लागत आहे. विकासाच्या नावाने भूलथापा दिल्यामुळेच आता मतदारांना सहलीसाठी पाठवावे लागत आहे याची मात्र इतिहासात नोंद झाली आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये सांगलीतील मतदार चमत्कार करतील. अशी अशा काहींना वाटत आहे.

——————————————————-&—–
फोटो– सातारा सांगली निवडणुकीतील मतदारांना सहलीसाठी

पाठवण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले

Scroll to Top