ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त साताऱ्यात कार्यक्रम

सातारा(अजित जगताप) : वीर शिरोमणी महाराणा प्रताप महाराज यांच्या ४८६ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंतीचे विविध कार्यक्रम होत आहेत. श्री महाराणा प्रताप उत्सव समितीच्या वतीने महाराणा प्रताप चौक, बसपा पेठ ,राधिका रोड सातारा या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमाला छत्रपती शिवरायांचे थेट वंशज व सातारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अँड .डी.जी बनकर, मुख्याधिकारी विनोद जळक व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती समारोह होत आहे. तसेच अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. सातारा जिल्ह्यातील रजपूत बांधव यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. महाराणा प्रताप यांच्या कार्याची महंती जगभर पसरलेली आहे. जावली तालुक्यात मेढा , सायगाव व विविध ठिकाणी दत्ता पवार मेढेकर, रमेश पवार, उमेश पवार , सुरेश पवार, वडूज या ठिकाणी सुरज पवार, निलेश पवार यांच्यासह अनेक बांधव कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत. रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याची माहिती पब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश अनिल उबाळे, नितीन रोकडे , अशोक भिसे यांनी दिली आहे.
बुधवार दिनांक १७ जून रोजी सातारा शहरात सकाळी बसपा पेठेतील महाराणा प्रताप चौकात श्री महाराणा प्रताप महाराज यांच्या मूर्तीचे पूजन आणि दुपारी रक्तदान शिबिर तसेच सायंकाळी सात वाजता जाहीर अभिवादन कार्यक्रम आणि बक्षीस समारंभ होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी रजपूत समाज सेवा संघ ,सातारा अध्यक्ष वीरसिंग परदेशी ,शैलेंद्र परदेशी, राजेंद्र परदेशी, अनिल परदेशी, महेंद्र राजपूत, मुकुंद सिंह परदेशी, ओमकार परदेशी, नितीन परदेशी, अमर परदेशी यांच्यासह रजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बुधवार दिनांक १७ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
……………………………………………
फोटो- महाराणा प्रताप

Scroll to Top