मुंबई : मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून अन्न पॅक करण्यासाठी (बांधण्यासाठी) आणि वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचे अलीकडेच निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय, पश्चिम क्षेत्र) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या शिवाय एफएसएसएआय नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच एफएसएसएआय आणि एफडीआय एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे वडापाव व्यावसायिक मुंढे यांच्या रडारवर आले आहेत.
_शहर आणि परिसरात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची शक्यता लक्षात घेऊन, एफएसएसएआय (पश्चिम क्षेत्र) ने अन्नपदार्थ विक्रेत्यांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी अन्नपदार्थ बांधण्यासाठी किंवा वाढण्यासाठी, तसेच इतर कोणत्याही प्रकारे अन्नाचा थेट संपर्क येईल अशा गोष्टींसाठी वर्तमानपत्रांचा वापर बंद करावा. छपाईच्या शाईमध्ये अनेक हानिकारक रंग, रंगद्रव्ये, बाइंडर्स आणि रसायने असतात, विशेषतः यात शिसे आणि इतर जड धातूंचा समावेश असतो, जे अन्नपदार्थांमध्ये उतरू शकतात आणि त्यामुळे आरोग्याच्या गंभीर आणि दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. वृत्तपत्रांचे वितरण आणि हाताळणीदरम्यान ती अनेकदा अस्वच्छ होतात. त्यामुळे ती अन्नजन्य आजार निर्माण करणाऱ्या रोगजंतूंचे वाहक बनू शकतात. त्यामुळे वडापावच्या पॅकिंग साठी वृत्तपत्राचा कागद वापरू नये, असे आदेश दिले आहेत.




