ताज्या बातम्या

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त तीन पुस्तकांचे प्रकाशन २९ जुलैला

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डिंपल पब्लिकेशनतर्फे तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ॲड. हर्षल प्रधान लिखित ‘मार्मिक प्रबोधनाचे शतक’ आणि ‘मर्मभेद’ या दोन पुस्तकांसह ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी संपादित केलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक व्यंगचित्रांचा संग्रह ‘ज्वलंत रेषा’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
कार्यक्रमाला शिवसेना युवानेते आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, मुक्त पत्रकार विजय सामंत, संपादक प्रकाश सावंत, राकेश टोळ्ये, मुकेश माचकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून साहित्यप्रेमी, व्यंगचित्र रसिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. हर्षल प्रधान आणि अशोक मुळे यांनी केले आहे.

Scroll to Top