ताज्या बातम्या

शिक्षण व्यवस्था ढासळली; विद्यार्थ्यांवरील लाठीमारासाठी अमित शहा जबाबदार – राहुल गांधी

नवी दिल्ली : देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रणाली भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून त्याविरोधात देशभरातील विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राहुल गांधी म्हणाले की, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा. मात्र विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारासाठी ते जबाबदार नाहीत. त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आहे. त्यामुळे अमित शहा यांनीही राजीनामा द्यावा.”
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करत, “गृहमंत्री हे पंतप्रधानांना अहवाल देतात. त्यामुळे या घटनेची नैतिक जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वीकारून देशाला उत्तर द्यावे,” अशी मागणी केली. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे.

Scroll to Top