मुंबई(ओमकार धुळप) : लावणी आणि लोककला क्षेत्रातील कलावंतांचा गौरव करणाऱ्या लावणी कलावंत महासंघाच्या वतीने १२ वा वर्धापन दिन व भव्य ‘लावणी गौरव पुरस्कार’ सोहळा बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता दादर येथील छत्रपती श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात लोककला आणि लावणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कलावंतांना ‘लावणी गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारांची घोषणा ३ जून रोजी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील, विश्वस्त जयेश चाळके, अध्यक्षा कविता घडशी, सरचिटणीस विशाल सदाफुले, खजिनदार योगिता मोर्जे आणि समन्वयक विजय कर्जावकर यांनी संयुक्तपणे केली.
यावर्षीचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आणि नामवंत संगीतकार मधुकर रेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
तसेच लावणी गौरव पुरस्कार खालील मान्यवरांना घोषित करण्यात आले आहेत :
शाहीर आनंद सावंत,
लावण्यवती कविता घडशी,
लोककलावंत चंद्रकांत बारशिंगे,
गायिका श्रद्धा साळवी,
निर्माते शंकर पिसाळ,
गायक राजेश धाऊस्कर,
ध्वनी संयोजक संदेश गायकवाड,
तालवादक दीपक गायकवाड,
पुरुष लावणी कलावंत चंद्रकांत तांबे,
याशिवाय, ‘राजा-राणी पुरस्कार’ श्री. सुनील खंडागळे व सौ. मयुरी सुनील खंडागळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार घोषणेच्या वेळी महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी सोहळ्याबाबत लावणी व लोककला क्षेत्रात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाला सिने चित्रपट सृष्टीतील कलाकार,विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित असतात.त्यांच्या शुभहस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात येत असते. लावणी पुरस्कार ज्यांना जाहीर झाले आहेत.त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




