ताज्या बातम्या

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रातील पहिल्या सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

अकोले (अहिल्यानगर): शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तालुका तिथे संगीत विद्यालय या अभिनव संकल्पनेअंतर्गत संस्थेच्या राज्यातील पहिल्या सांस्कृतिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा आज १ जून २०२६ रोजी अबीटखिंड (भोजनेवाडी), ता. अकोले येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान चे विश्वस्त, तसेच राज्यकार्यकारणी सदस्य, जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

राज्यभरातील कला संगीत क्षेत्रातील उपेक्षित कलावंत तसेच दूरवर गावाखेड्यात जन्मल्या कलावंतांसाठी त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी उभी राहिलेली ही संस्था अल्पवाधित महाराष्ट्रभर पसरते. हजारो सदस्य संख्या असलेल्या या संस्थेने ना केवळ जे ठरवले ते केले तर जे जे स्वप्न कलावंत पाहत आहेत त्या त्या स्वप्नांना साकार करत आहे ही संस्था. संस्थेने तालुका तेथे संगीत कला विद्यालय संस्कृतीक केंद्र या ध्येयाने काम सुरु केले आणि बघता बघता जवळ जवळ महाराष्ट्रभरातील २२ तालुक्यात संस्थेला जमीन दान स्वरूपात मिळाल्या असून त्या जमिनीवर भव्या दिव्या अशी संगीत कला विद्यालय संस्कृतीक केंद्र उभी राहणार आहेत. संस्थेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कला, संगीत आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळणार असून विद्यार्थ्यांना व कलाकारांना नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. याची सुरुवात आजचा या भूमिपूजनाने झाली असे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक-अध्यक्ष मा. श्री. राजारामबुवा शेलार होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा संघटक सचिव संदीप जाधव, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामनाथ भोजने, राज्य कार्यकारणी सदस्य विनोद शिंदे, शैलेश विरखरे, अशोक कदम, प्रवीण तांबे यांच्या सह सांगली जिल्हाध्यक्षा प्रणाली पाटील, मुंबई उपनगर अध्यक्ष निलेश गुंडाळे, सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक मांढरे सातारा जिल्हा सचिव चंद्रकांत घुडेकर लोकनाट्य तमाशा सम्राट, राज्य कार्यकारिणी सदस्य विकी खोकरे, शाहीर अशोक बागुल संभाजीनगर जिल्हा यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन विधी संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील कला आणि संस्कृती संवर्धनास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कला रसिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या अहिल्यानगर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच भोजनेवाडी येथील सर्व ग्रामस्थ, युवक व महिलांनी यशस्वीरीत्या केले.

Scroll to Top