ताज्या बातम्या

‘एसआयआर’ मोहिमेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे उतरले मैदानात

मुंबई : निवडणूक आयोगाकडून राबविल्या जाणाऱ्या मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. एसआयआर मोहिम यशस्वी करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने विधानसभानिहाय बैठकांचे सत्र सुरू असून आयोगाच्या अधिकाऱ्यांना (बीएलओ) मदत करण्यासाठी पक्षाच्या वतीने यादीनिहाय बीएलए (बूथ लेव्हल एजंट) यांच्या नेमणुका करण्यात येत आहेत. या मोहिमेत राज्यपातळीवर मोठी जबाबदारी सांभाळणारे शिवसेनेचे सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे आता बीएलए -2 म्हणून प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहेत.माजी खासदार राहुल शेवाळे हे मुंबईच्या पूर्व उपनगरातील अणुशक्तीनगर विधानसभेतील प्रभाग क्रमांक 144 मध्ये वास्तव्याला आहेत. सदर विधानसभेत शिवसेनेच्या वतीने स्थानिक विभागप्रमुख अविनाश राणे हे बीएलए -1 म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच, प्रत्येक मतदारयादीसाठी स्वतंत्र बीएलए -2 ची नियुक्ती करण्यात आली आहे. इथल्या मतदारयादी क्रमांक 68 मध्ये शेवाळे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नाव आहे. म्हणून या यादीसाठी स्वतः शेवाळे यांनी बीएलए -2 म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. विभागप्रमुखांकडून त्यांनी नुकतेच या नियुक्तीचे पत्र स्वीकारून नवा पायंडा पाडला आहे. अशा रीतीने सर्व नेते, आजी-माजी खासदार,आमदार, नगरसेवक यांनी प्रत्यक्षपणे आपापल्या मतदारयादीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेवाळे यांनी केले आहे.बीएलए -2 ची नेमकी जबाबदारी काय?
निवडणुक आयोगाच्या वतीने नेमण्यात आलेल्या बीएलओ पदावरील अधिकाऱ्यांना त्यांच्याअखत्यारीतील मतदारयादीच्या फेरतपासणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे काम यादीतील बीएलओ – 2 मार्फत केली जाणार आहे. सदर मतदारयादीतील त्रुटी दूर करतानाच, कोणत्याही अधिकृत मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ नये, यासाठी पक्षाच्या वतीने नेमण्यात आलेले सर्व बीएलए, आयोगाच्या बीएलओ सोबत प्रत्यक्ष यादीवर काम करणार आहे.“निवडणुक आयोगाच्या वतीने राबविली जाणारी एसआयआर मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आदेश माननीय उपमुख्यमंत्री,शिवसेना मुख्यनेते श्री. एकनाथजी शिंदे यांच्यावतीने देण्यात आले आहेत. राज्यभरात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पक्षातील इतर नेत्यांसोबत मलादेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, यापुढे एक पाऊल टाकत माझं नाव ज्या मतदारयादीत आहे, त्या मतदार यादीची फेरतपासणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी मी स्वतः बीएलए -2 म्हणून नियुक्ती स्वीकारली आहे. अशाच पद्धतीने पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी आणि आजी माजी लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारयादीची जबाबदारी स्वीकारून एसआयआर मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे मी आवाहन करतो”
-राहुल रमेश शेवाळे, राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार

Scroll to Top