ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग. प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांना प्रोफेसर पदी पदोन्नती

मुंबई : वसई स्टेला येथील रहिवाशी डॉ. गणेश चंदनशिवे हे टेंभुर्णी ता जाफराबाद जि. जालना येथील सुपुत्र,असून ते मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत गेल्या वीस वर्षा पासून कार्यरत आहेत प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे मुंबई लोककला विभागाच्या प्रोफेसर पदी पदोन्नती मिळाली आहे. नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या वरिष्ठ निवड समितीची बैठक संपन्न होऊन डॉक्टर गणेश चंदनशिवे यांना प्रोफेसर पदी पदोन्नती एकमताने मान्य करण्यात आली.त्यांना प्रोफेसर पदी मान्यता मिळाल्यामुळे वसई मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. वसईकरांचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉक्टर गणेश चंदनशिवे यांचे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण टेंभुर्णीच्या नवभारत कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाले आहे. त्यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की मी वसई चे ऋण कधीही विसरणार नाही. वसई ही माझी जरी जन्म भूमी नसली तरी ती माझी कर्मभूमी आहे .या पायाभरणी वरच मी आज उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी नाट्यकलेचे शिक्षण घेतलेले आहे. तमाशा लोककला या विषयावर त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी मिळवलेली आहे. त्यांचा लोककला हा अभ्यास विषय असून ,तमाशा लोकपरंपरा या विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. विविध संशोधन कार्यात त्यांचा पुढाकार असतो. विविध अभ्यास मंडळावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहे. परदेशात लोककलेचे महत्त्व वाढवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भारतातील विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लोककलेचा अभ्यास कसा करावा याबद्दल ते प्रशिक्षण देत असतात. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. लोकसाहित्य आणि लोककला क्षेत्रात त्यांची विविध ग्रंथ संपादा असून विविध साहित्य संमेलना ते अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. विविध वृत्त वाहिन्यावर त्यांचे मुलाखती प्रसिद्ध झालेल्या असून त्यांच्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर माझा कट्ट्यावर त्यांच्या विशेष मुलाखती प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक हिंदी मराठी चित्रपटामध्ये त्यांनी पार्श्वगायन केले आहे.लोककलेचा बाज असलेले चंदनशिवे वसई आणि पालघर परिसराचे नाव पुढे करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परदेशातही वसईचा मी वसईचा हे आवर्जून सांगणारे गणेश चंदनशिवे यांस मुंबई विद्यापीठाने प्राध्यापक पदी पदोन्नती देऊन लोककलेचा एका अर्थाने सन्मान केला असेच म्हणावे लागेल

Scroll to Top