बार्शीटाकळी (जि. अकोला), दि. ११ एप्रिल २०२६ :
तालुक्यातील राजंदा येथून १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्ती उर्फ गौरी दत्तात्रय महल्ले (वय १४ वर्षे ७ महिने) असे या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भक्ती आज पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली. त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर या घटनेची माहिती बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांकडून शोधमोहीम वेगाने सुरू करण्यात आली आहे.
ओळख पटवण्यासाठी महत्त्वाची माहिती
नाव: भक्ती उर्फ गौरी दत्तात्रय महल्ले
वय: १४ वर्षे ७ महिने, राहणार: राजंदा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला
विशेष खूण: पाठीवर निळ्या रंगाची स्कूल बॅग
पायात गुलाबी रंगाची चप्पल, जर कोणालाही संबंधित मुलगी दिसली किंवा तिच्याबाबत माहिती मिळाली, तर त्वरित खालील अधिकाऱ्यांशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा: प्रवीण धुमाळ (पोलीस निरीक्षक): 9420246968, अमित सुगंधी (पोहेकॉ, राजंदा बिट अंमलदार): 8766567054, मनीष घुगे (पोलीस कॉन्स्टेबल): 7887335334
नागरिकांना आवाहन
या मुलीचा शोध लागण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. आपल्या सतर्कतेमुळे एका कुटुंबाला त्यांची लेक सुखरूप परत मिळू शकते.




