ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

सानपाडा येथे भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा सेक्टर ११ मध्ये भक्ती रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा जवळ भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच प्रभाग १९ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. शैला पाटील, सौ. शिल्पा ठाकूर, नगरसेवक श्री. भाऊ भापकर, श्री. सुनील कुरकुटे, समाजसेवक श्री. अजय पवार, श्री तानाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, नगरसेविका सौ.कोमलताई वास्कर, प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक अभिजीत देसाई, समाजसेवक मिलिंद सूर्याराव, शुभांगी सूर्याराव, समाजसेवक गणेश पावगे, सानपाडा ७.५० गार्डन ग्रुपचे रणवीर पाटील, दत्तात्रय कुरळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, चिटणीस जगदीश एकावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, सह खजिनदार सुभाष बारवाल, उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी, हास्य क्लब गार्डन ग्रुप ६.३० चे भरत खरात, गार्डन ग्रुप ७.०५ चे जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा टोपी, रुमाल आणि तुलसीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. नगरसेवक भाऊ भापकर आणि समाजसेवक अजय पवार यांनी विश्वासराव कुटुंबियांच्या विजया इंटरप्राईजेस यांच्यातर्फे महाराष्ट्र सरकार आणि खाजगी सेवा एकाच ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या सेवाभावी कार्याला शुभेच्छा दिल्या.

Scroll to Top