ताज्या बातम्या
जात प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी जुन्या शालेय नोंदींच्या डिजिटल जतनाची मागणी; आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांना निवेदनसोळशी विभाग विकास सेवा सहकारी सोसायटीतून सौ. शारदा संजय गायकवाड यांची बिनविरोध निवड; १०५ गाव समाज संघटनेच्या एकजुटीचा विजयराज्य मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, राज्यात ५ नवीन न्यायालयांना मंजुरी‘दीपावली’ ठरला राज्यातील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक; मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रतिष्ठित स्पर्धेचा निकाल जाहीरसीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेकडून सत्कार

बाळासाहेब भिलारे यांच्या मानसपुत्राच्या विजयासाठी वसई–विरारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार मेळावा

विरार : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसई–विरार परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यासाठी परिसरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्याचे नियोजन संजूबाबा गायकवाड यांचे विश्वासू सहकारी तथा उद्योजक (सोनाट) श्री. शांताराम कदम यांनी केले होते. त्यांना घावरी गावचे श्री. किसन जाधव, खरोशी गावचे श्री. समीर कदम, श्री. संपत कदम, देवळी गावचे श्री. आनंद जाधव, श्री. भगवान जाधव आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्री. अंकुश मोरे (येरणे), युवा उद्योजक श्री. भाऊ मोरे (आमशी), श्री. अरुण संभाजी जंगम, श्री. पारुनाथ जंगम, श्री. शंकर जंगम (माजी पोलीस पाटील, तळदेव), श्री. आनंद संकपाळ (वेळापूर), श्री. तानाजी जाधव (देवसरे), श्री. नितीन संकपाळ (वेळापूर), श्री. प्रदीप पवार (देवळी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी स्वामी अरुण जंगम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “ज्या उमेदवाराने दहा वर्षे सभापतीपद भूषवले आहे, त्याला १०५ गावाचा आराखडा माहीत आहे. अशाच अनुभवी उमेदवाराला निवडून देऊन भागाचा सर्वांगीण विकास साधावा. पैशाच्या आमिषाला बळी पडू नका,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात संजूबाबा गायकवाड यांनी कार्यकर्त्यांनी मेहनतीने हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल आभार मानले. तसेच, “ज्या विश्वासाने तुम्ही मला पंचायत निवडणुकीत साथ दिली, त्याच ताकदीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांनाही पाठिंबा द्या,” अशी हाक त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.
कार्यक्रमाची सांगता सोनाट गावचे उद्योजक श्री. विठ्ठल कदम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून केली.

Scroll to Top