ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

पुन्हा हार्बर लाईनचा डबा घसरला

मुंबई : मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरुन एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी २९ एप्रिलला या ठिकाणी लोकलचा  एक डब्बा रुळावरुन घसरला होता. आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी लोकल रुळावरुन घसरली आहे. या पॉइंटची दुरुस्ती करुन रिकामी लोकल चालवण्यात येत होती, मात्र चाचणीदरम्यानच ही रिकामी लोकल रुळावरुन घसरली.

या घटनेमुळे हार्बर लाईनवरील  वाहतूक सीएसएमटी ते वडाळा  दरम्यान दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद झालेली आहे. जोपर्यंत लोकल पुन्हा रुळावर येत नाही, तोपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. १ मे रोजी सुट्टी असल्याने तितकासा फटका बसला नसला तरी आजच्या दिवशी प्रवास करणार्‍यांचे यामुळे हाल झाले आहेत.

दरम्यान, हार्बर लाईनवर रुळावरुन घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, तोपर्यंत हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत राहणार आहे. याशिवाय हार्बर मार्गावरील वेळापत्रक देखील कोलमडणार आहे.

Scroll to Top