ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

दादर अग्निशमन केंद्राच्या भिंतींवर शौर्यगाथा; ‘अनल गणेश मंदिरा’चा जीर्णोद्धार सुरू

मुंबई- बुधवार(सदानंद खोपकर) मुंबईच़्या अगदी ह्रदयात म्हणता येईल अशा दादर पूर्व भागात जीवाची बाजी लावून आगीतून असंख्य वेळा मुंबईकरांचं जीवित रक्षण करत आलेल्या बहादूर अग्निशमनमन केंद्राच्या बाहेरील भिंत ही आगीशी खेळून कर्तव्यकर्म केलेल्या अग्निशमनदल जवानांच्या चित्रांनी सजली आहे.जाणारा येणारा प्रत्येक इथे क्षणभर थबकून जवानांच्या शौर्याला दाद देऊनच पुढे सरकतो.
या सुसज्ज अग्निशमनदल केंद्रातील स्वयंभू अनल शांती गणेश मंदिराचा आता जीर्णोद्धार होत आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेला हा अनिल गणेश येथे कसा प्रकटला ही कथाही अविस्मरणीय आहे.

Scroll to Top