ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त !!

प्रतिनिधी : नुकताच यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉइंट येथे समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गौरविण्याचा हा सोहळा. “सन्मान कार्याचा- गौरव महाराष्ट्राचा” अशी या पुरस्काराची घोषणा होती. महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा “संत रविदास पुरस्कार २०२३- ०२४” साठी, रोहिदास समाज पंचायत संघ, संत रोहिदास भवन परळ मुंबई. ह्या संस्थेला महाराष्ट्राचे विद्यमान लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची प्रतिमा- सन्मानपत्र आणि एक लाख धनादेश देऊन, ‘सत्कार’ करण्यात आले.
ह्या शुभ प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले, जलसंधारण मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी उपस्थित होते. तसेच पुरस्कार स्वीकारताना संघाध्यक्ष मयुर देवळेकर, मिलिंद चव्हाण (सरचिटणीस), छगन खेडेकर (विश्वस्त व समाज कल्याण समिती), आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, चर्मकार समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. एकमेकांचे अभिनंदन करत बोलत,
जय रोहिदास बोला अभिमानाने बिंदासऽऽऽ !!

Scroll to Top