Sunday, April 20, 2025
घरमहाराष्ट्रजी-उत्तर विभागामध्येकचरा निर्मुलन संबधीत अनेक विषयांवर चर्चा सत्र संपन्न!

जी-उत्तर विभागामध्येकचरा निर्मुलन संबधीत अनेक विषयांवर चर्चा सत्र संपन्न!


प्रतिनिधी : जी-उत्तर विभागामध्ये आज सोमवार दि.२२/०४/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कचरा निर्मूलन संबधीत शंभर टक्के वेट वेस्ट,ओपन डंप निष्कासी करणे,हाऊस टू हाऊस,बल्क वेस्ट जनरेशन ईत्यादी तसेच स्वच्छता दूत यांच्या कामगिरीचा आढावा तसेच हवरली ट्रॅक्शन वेळापत्रक इत्यादी आणि अनेक विषयांवर चर्चा सत्र सहाय्यक अभियंता तथा ओएसडी श्री काझी सर यांनी घडवून आणले.
या चर्चा सत्राची अंमलबजावणी करण्यापूर्वी विभागातील गृहनिर्माण संस्थांकडून कचरा सेग्रिगेशन करणे तसेच सोसायटी तून शून्य कचरा ,तसेच ओपन डंप एलिमिनिशन ईत्यादी कामाची सुरुवात झाली असुन प्रत्येक जे एस ने आपापल्या कामगिरीचा अहवाल आजच्या बैठकीत सादर केला.
प्रत्येक जे एस ची कामगिरी पाहून श्री काझी सरांनी समाधान व्यक्त केले.
तसेच ०७ कचरा संकलन केंद्र निष्कासीत करण्याचे जे एस ला दिलेल्या टार्गेटपैकी आतापर्यंत ०३ कचरा केंद्र (कचर्या पेट्या) निष्कासीत केली आहेत.
एप्रिल अखेर पर्यंत दोन तर उर्वरित में अखेरपर्यंत दिलेले टार्गेट पूर्ण करु असे सर्व जे एस नी आश्वसीत केले आहे
घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक सेक्शनला एक ते दोन एससीव्ही देण्यात आल्या असून त्यांच्या कामवर
एमएल जे. एस. श्रीम.स्वाती केदारे,श्री प्रशांत आचरेकर आणि शामजी परमार बारीक लक्ष ठेवून आहेत.
यासाठी घरोघरी एससीव्हीचा पूरेपूर उपयोग करुन घेताना स्वच्छता दूत यांचा याकामी उपयोग करून घ्यावा अशा सूचना श्री काझी साहेबांनी दिलेल्या आहेत.
ड़पींगला जाणारया गाड्या शंभर टक्के वेट वेस्ट कराव्यात, हाऊस टू हाऊस वाढविणे, कचरा संकलन केंद्र निष्कासीत करावीत,BWG असणार्या गृहनिर्माण संस्थांचा कचरा उचलून नये, संबंधितांना नोटीस देणे,दडात्मक कारवाई करुन प्रसंगी पोलीस कारवाई करण्यात यावी अशा सूचना सदर सभेत देण्यात आल्या.
या चर्चा सत्रात मुकादम, स्वच्छ्ता दूत सर्वं जे एस
पर्यवेक्षक श्री रत्नकांत सावंत,राजेश भावसार इत्यादींनी भाग घेऊन चर्चा सत्र यशस्वी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments