कराड (अजित जगताप) : भारतीय जनता पक्षाने पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विदर्भ मधील पाच लोकसभा मतदार संघात शांततेने मतदान झालेले आहे. आता पुढील टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवाराच्या विजयासाठी मोर्चा बांधणी केली जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी विद्यानगरी, कराड या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
काल सायंकाळी सभा स्थळाची पाहणी करून भाजप कोअर कमिटीने वरिष्ठ नेत्यांना सविस्तर माहिती दिलेले आहे . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या दिवशीच कराड या ठिकाणी जाहीर सभा होत आहे. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, पक्ष प्रभारी व सातारा महायुतीचे उमेदवार श्री छ खा. उदयनराजे भोसले, माढा उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे व मान्यवर मंडळी या सभेला हजर राहणार आहेत. अशी माहिती देण्यात आली.
भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश सदस्य विक्रम पावसकर, सुनील काटकर व डॉ. अतुल भोसले, सागर शिवदास यांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सभा यशस्वी होईल असे सांगितले .
सातारा जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष अशा विविध संघटना व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत उद्या शनिवारी सातारा येथील भाजप कार्यालयात चर्चा विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ही सभा यशस्वी करून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आतापर्यंत कराड, सातारा, पाटण, जावळी, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, खटाव या परिसरात भाजपचे उमेदवार श्री. छ. खा. भोसले यांचे संपर्क दौरे झाले आहेत. भाजप सातारा -जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पाटण पालकमंत्री शंभूराजे देसाई , कोरेगावचे शिवसेना आ. महेश शिंदे, वाई- खंडाळा- महाबळेश्वर आमदार मकरंद पाटील हे आणि त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झालेले आहेत. भाजप प्रदेश निवडणूक प्रभारी निर्भर सुराणा यांच्याशी संवाद साधून प्रचार यंत्रणा गतिमान करण्यात आलेली आहे. कराड येथील विद्यानगर मध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मोदी है तो मुमकिन है… सातारा जिल्हा भाजप का नमकीन है.. अशा घोषणा देण्यात येत आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकाचा जिल्हा असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन लोकांना काय आश्वासित करतात. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या सभेला किमान दोन लाख कार्यकर्ते व मतदार उपस्थित राहतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या विद्यानगरी येथील रानात ३ एकर क्षेत्रामध्ये काही भागात ज्वारीचा कडबा आहे. तो त्वरित काढून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कराड येथील नियोजित दौऱ्याची आखणी करण्यासाठी शनिवारी दुपारी भाजप कार्यालय या ठिकाणी महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची विचार विनिमय बैठक आयोजित केलेली आहे. ही सभा यशस्वी करून श्री छ खा उदयनराजे भोसले यांच्या कमळ या चिन्हाचे मताधिक्य वाढवण्यासाठी आता महायुतीतील घटक पक्षांमध्ये चढा ओढ लागलेली पहाण्यास मिळत आहे.
—————————————-+—-
फोटो विद्यानगरी कराड या ठिकाणी 35 एकर मैदानाची पाहणी करताना भाजप पदाधिकारी व मान्यवर (छाया- अजित जगताप, कराड)
