Thursday, April 17, 2025
घरमहाराष्ट्ररोटरी क्लब कराड कडून महिलांना आटा चक्की चे वितरण

रोटरी क्लब कराड कडून महिलांना आटा चक्की चे वितरण

प्रतिनिधी : डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकल यांच्या संकल्पनेतून डिस्ट्रिक्ट ग्रँट प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब कराड कडून गरजू महिलांना व्यावसायिक आटा चक्कीचे वितरण करण्यात आले. कराड मधील संकल्प रमेश शहा आणि सौ. सारिका संकल्प शहा यांच्या हस्ते 3 महिलांना व्यावसायिक आटा चक्की चे वितरण करण्यात आले. यावेळी आरटीओ चैतन्य कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजातील एकल आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी 2 एचपी क्षमतेच्या ताशी 25 किलो धान्य आणि मसाला बनवता येईल, अशा कमर्शियल आटा चक्कीचे वितरण करण्यात आले. श्रीमती बिजली सचिन देशमुख (राजमाची), श्रीमती उर्मिला विजय महापुरे (वहागाव) आणि वंदना तानाजी सकट (हजारमाची) यांना या आटा चक्की देण्यात आल्या. गरजू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, आपली उपजीविका चालवता यावी आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी याकरीता हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी रोटरी क्लब कराड चे अध्यक्ष बद्रीनाथ धस्के, सेक्रेटरी शिवराज माने, परिवर्तन स्पेशल प्रोजेक्ट चे चेअरमन अशोक इंगळे, इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या अध्यक्षा तरुणा मोहिरे, अपूर्वा पाटणकर, शिवाजीराव डुबल, हजारमाची च्या माजी सरपंच विद्या घबाडे, किरण जाधव, गजानन माने, आनंदा थोरात, रामचंद्र लाखोले, राजीव खलीपे, अभिजीत गोडसे, चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments