Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रसातारा मुख्यधिकारी यांनी ठेकेदार अभिजीत बापटांची चौकशी करावी -विजय सोनवणे

सातारा मुख्यधिकारी यांनी ठेकेदार अभिजीत बापटांची चौकशी करावी -विजय सोनवणे


सातारा(अजित जगताप) : सातारा नगरपालिका कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत सातत्याने आंदोलन करत आहेत. याबाबत यापूर्वीच्या अनेक सातारा नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवले आहेत .पण सध्या आंदोलन घंटागाडी कामगारांना बदनामी करण्यासाठी काही प्रवृत्तीला हाताशी धरले जात आहे. त्यामुळे सातारचे प्रामाणिक व कामगारांचे हिताचे निर्णय घेणारे मुख्याधिकारी यांनी ठेकेदार अभिजीत बापटांची चौकशी करावी. अशी मागणी विजय सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसापासून कंत्राटी कामगार व जनता क्रांती दलाचे नेते सत्यवान कमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे पदाधिकारी विजय सोनवले, अक्षय भिसे, राणीताई किरतकर्वे व दत्ता केंगार, रोहिणी लोहार आणि घंटागाडी कंत्राटी कामगार ऊन- वारा- पावसाची तमा न बाळगता आंदोलन करत आहेत. हे आंदोलन लोकशाही मार्गाने चालत असून आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बदनाम केले जात आहे. असे आरोप ही श्री सोनावले यांनी केलेला आहे.

दरम्यान, याबाबत सातारा जिल्हा प्रशासन व सातारा नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही तर साताऱ्यातील सर्व कंत्राटी घंटागाडी कामगार हे कचरा संकलित करून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात टाकतील. असा इशारा देण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments