Thursday, April 17, 2025
घरमहाराष्ट्रबेकायदेशीर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई; १०५ सिलेंडर,८३ हातगाडी जप्त

बेकायदेशीर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई; १०५ सिलेंडर,८३ हातगाडी जप्त

मुंबई : मुंबई महापालिकेने धडक कारवाई करत बेकायदा फळभाज्या, भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. पालिकेच्या २४ वॉर्डात ही कारवाई करण्यात येत असून मंगळवारी एका दिवसांत ग्रँट रोड, वांद्रे व कुर्ला याठिकाणाहून १०५ सिलिंडर, ८३ हातगाडी आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एकूण ३२९ हातगाडी व सिलेंडर जप्त केले. दरम्यान, बेकायदा खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

पावसाळी आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बेकायदा खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. फुटपाथ, स्टेशन परिसरात बेकायदा स्टॉल लावणारे पालिकेच्या रडारवर आले असून मंगळवारी एका दिवसांत सांताक्रुझ, ग्रँट रोड, मुलुंड, चेंबूर, भांडुप, बोरिवली, कांदिवली आदी ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा बडगा उगारत बेकायदा फळभाज्या भाजीपाला खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांच्या हातगाडी, सिलेंडर जप्त केले आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments