Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रपत्रकार जनार्दन कांबळे काजिर्डेकर यांचे मुंबईत निधन!उद्या त्यांचे पुण्यानुमोदन आणि जाहीर शोक...

पत्रकार जनार्दन कांबळे काजिर्डेकर यांचे मुंबईत निधन!उद्या त्यांचे पुण्यानुमोदन आणि जाहीर शोक सभा!

प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावचे सुपुत्र पत्रकार तसेच कवी जनार्दन कांबळे यांचे दि. १ जुन २०२४ रोजी अल्पशा आजाराने मुंबई मध्ये निधन झाले ते ५६ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दिवंगत जनार्दन कांबळे हे मुंबई या ठिकाणी शालेय विभागात नोकरी करीत होते,
कवीता करून त्यांनी आपल्या काजिर्डा गावातील नैसर्गिक सौंदर्य हे कवितेतून रेखाटलेले आहे. तसेच ते निसर्गाचे उत्तम फोटो काढून ते संग्रही ठेवीत असंत,
राजापूर तालुक्यातील
पाचल- जवळेथर रस्त्यावरील
मुर- आंबा हा एस. टी. थांबा होण्यासाठी ते सतत अनेक वृत्तपत्रांमधून शासनाकडे जाब विचारून पाठपुरावा करीत असंत.
काजिर्डा हे सह्याद्रीच्या खोर्यातील गाव असून या गावातील ऐतिहासिक म्हातारं धोंड या बाबत त्यांनी वृत्तपत्रांमधून लिखाण करुन जामदाखोर्यातील नागरिकांचे या म्हातारं धोंड या ऐतिहासिक स्थळांकडे लक्ष वेधून घेतले होते.
काजिर्डा गावांमध्ये चांगल्या प्रतीचे रस्ते होण्यासाठी तसेच ईतर प्राथमिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी ते वर्तमान पत्रांमधून सतत लिखाण करीत असंत.
दि.जनार्दन कांबळे उत्तम प्रकारे बासरी वाजवत असंत, रांगोळी काढणे, क्रिकेट खेळणे, बुद्धीबळ इत्यादी खेळ त्यांनी जोपासले होते.
त्यांनी अनेक वर्षे काजिर्डा विकास मंडळाचे सचीव पदावरुन जनसेवा केली.
ते निसर्ग प्रेमी असून ते पशूपक्षांवर फार प्रेम करीत असंत
त्यांच्या कविता ह्या निसर्गाच्या सहवासातील अनुभव यावर आधारित आहेत.
पत्रकार,कवी, समाजसेवक दि.जनार्दन कांबळे यांच्या अकाली मृत्यू मुळे तालुक्यातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.
उद्या त्यांचा पुण्यानुमोदन हा धार्मिक कार्यक्रम तसेच शोकसभा कार्यक्रम मुंबई मध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केला आहे.
त्यांच्या काजिर्डा विकास मंडळ, राजापूर तालुका बौध्दजन संघ च्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments