Tuesday, April 22, 2025
घरमहाराष्ट्रधारावीत आम्ही सातारकर प्रतिष्ठान तर्फे यूपीएससी, सीडीएस व एनडीए स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन...

धारावीत आम्ही सातारकर प्रतिष्ठान तर्फे यूपीएससी, सीडीएस व एनडीए स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर


प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षेत करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास विनामूल्य करियर मार्गदर्शन शिबीर महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट ,धारावी,मुंबई आणि आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सौजन्याने स्पर्धा परीक्षेसंबंधी म्हणजेच युपीएससी, सीडीएस (संरक्षण दलात अधिकारी) व एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी) याविषयी माहिती दिली जाणार आहे. इ.10 वी ,12 वी ,पदवी तसेच इतर तत्सम परीक्षा उत्तीर्ण, अनुत्तीर्ण असे विद्यार्थी तसेच ज्या विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षेतून आपले करियर घडवण्याची इच्छा आहे अश्या सर्वांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त श्री.प्रमोद माने यांनी केले आहे.या शिबीराला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा.श्री. बाबुरावजी माने तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या शिबीराला स्पर्धा परीक्षा अभ्यासक व तज्ञ मार्गदर्शक श्री. महेश कुलकर्णी मार्गदर्शन करणार असून दिनांक : ९ जून, २०२४ रोजी सकाळी 11.00 वाजता मनोहर जोशी महाविद्यालय, पीएमजीपी कॉलनी, धारावी बस डेपोजवळ,धारावी, मुंबई-400017 येथे हे मार्गदर्शन शिबीर होणार आहे.नांव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी  ९२ २१ ८४ ९६५० यांच्याशी मोबाईल वर संपर्क करावा

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments