प्रतिनिधी – माझ्या मतदार संघातील सर्वात मोठा प्रश्न आणि माझे स्वप्न म्हणजे धारावीचा विकास हाच माझा ध्यास आहे,त्यादृष्टीने कामाला प्रारंभ देखील झाला आहे. असे खासदार व महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेन्द्र वाबळे,विश्वस्त राही भिडे,कार्यवाहक संदीप चव्हाण व पत्रकार बांधव उपस्थित होते.
लोकसभेची निवडणूक म्हटली देशातील प्रश्नाविषयी ही निवडणूक असते. मात्र अनेक लोक किंवा राजकीय पक्ष हे कोविड बद्दल बोलत नाहीत.कोविड नंतरची ही पहिली निवडणूक आहे. कोणाचे आई-वडील,भाऊ-बहीण,नातेवाईक गेले तर लोकांचे रोजगार गेले,कोणाची दुकाने गेली, ही परिस्थिती फार गंभीर आहे,याविषयावर बोलले पाहिजे, कोरोनाच्या काळात धारावी सारख्या झोपडपट्टी मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळी सर्व यंत्रणा वापरण्यात आली.महानगरपालिका कर्मचारी,डॉक्टर,नर्स,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर यांनी प्रचंड मेहनत घेऊन काम केले,त्यामुळे ‘धारावी पॅटर्न’ जगभर गाजला,अशी अनेक कामे करता आली,महत्वाच्या विषयावर काम करता आले.हितुत्वाचा मुद्दा असो,की राष्ट्पती यांना पाठींबा असो या विषयी पाठपुरावा केला,यापुढे देखील पुढे चांगले काम करायचे आहे.ज्या मतदारांनी आम्हाला एकत्र आहोत म्हणून मतदान केले त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये याची काळजी घेऊन शिवसरने बरोबर कायम राहिलो
त्यामुळे मतदार राजा सुंज्ञ आहे,त्यामुळे त्यांना माहीत आहे,मतदान कोणाला करायचे आहे,असे शेवटी खासदार शेवाळे यांनी सांगितले.

