प्रतिनिधी : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बुधवारी सकाळी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन शेवाळे यांनी अप्पासाहेब यांचे आशीर्वाद घेतले. राहुल दादा धर्माधिकारी आणि सचिन दादा धर्माधिकारी यांच्याशी देखील शेवाळे यांनी संवाद साधला. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी राहुल शेवाळे यांना शुभेच्छा दिल्या.
