Tuesday, April 29, 2025
घरआरोग्यविषयकदुचाकी अपघातात दुखापत झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचे यकृत आणि फुफ्फुस वाचविण्यात डॉक्टरांना...

दुचाकी अपघातात दुखापत झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचे यकृत आणि फुफ्फुस वाचविण्यात डॉक्टरांना यश

प्रतिनिधी : दुचाकीच्या भीषण अपघातात यकृत आणि फुफ्फुसांना गंभीर दुखापत झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचे यकृत आणि फुफ्फुस वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. विशेषतः कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता या रूग्णाचे यकृत व फुफ्फुस वाचवले आहे. झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल यांच्या नेतृत्वाखाली अन्य एक डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे. ओटीपोटात दुखणे, छातीत अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तातील विषबाधा आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने रुग्णास आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. प्रसंगावधान राखत यशस्वी उपचार करुन डॉक्टरांनी या रुग्णाला नवे आयुष्य मिळवून दिले.

घाटकोपर येथील रहिवासी प्रशांत कदम हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. १५ एप्रिल रोजी ऑफिसमध्ये जात असताना सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांचा बाईक अपघात झाला. या अपघातात त्यांच्या यकृताला गंभीर दुखापत झाली होती. शरीराच्या आत रक्तस्त्राव झाल्याने फुफ्फुसालाही इला पोहोचली होती. अशा स्थितीत स्थानिक रहिवाशांनी त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना झायनोव्हा शाल्बी रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. याठिकाणी जनरल सर्जन डॉ. हेमंत पटेल यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. वैद्यकीय तपासणीनंतर रूग्णाच्या यकृताला आणि फुफ्फुसाला दुखापत झाल्याचे लक्षात आले. अशा स्थितीत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता रूग्णाचे यकृत वाचवले आहे.

झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल म्हणाले की, अपघातानंतर रूग्णाला उपचारासाठी आणले तेव्हा त्यांची सीटी स्कॅन आणि एमआरआय चाचणी करण्यात आली. या वैदयकीय अहवालात हेमोथोरॅक्स आणि उजव्या यकृताच्या लोबच्या ५०-७५% इला झाली होती. नाकातील ऑक्सिजन, इंट्राव्हेनस अँटिबायोटिक्स, इंट्राव्हेनस फ्लुइड्स, नेफ्रो प्रोटेक्टिव्ह आणि हेपॅटो प्रोटेक्टीव्ह औषधांनी रुग्णाला कंझर्व्हेटिव्हली व्यवस्थापित करण्यात आले. रुग्णाला स्थिर केल्यानंतर हेमोथोरॅक्स काढून टाकण्यात आले. 12 दिवसांच्या प्रभावी उपचारानंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले. रुग्णाची पोटदुखी पूर्णपणे थांबली होती. आता हा रुग्ण त्याची सर्व दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणे करु लागला आहे.

रूग्ण प्रशांत कदम म्हणाले की, अपघातानंतर माझ्या यकृताला आणि फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाली होती. या दुर्घटनेतून जीव वाचण्याची शक्यता कमी होती. मात्र मला तातडीने उपचार मिळाल्याने आज मला नवे आयुष्य मिळाले. यासाठी मी डॉक्टरांच्या संपुर्ण टीमचा आभारी आहे. मी पूर्वीसारखाच पुन्हा काम सुरू करू लागलो आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments