प्रतिनिधी(प्रताप भणगे) : तुळसण – कोळेवाडी रस्त्यालगत तुळसण खिंडीच्या जवळ असलेल्या सातारा वनविभागाच्या वन परिमंडळ कोळेच्या तुळसण ता. कराड येथील हद्दीत परिसरातील ग्रामस्थ मेलेली जनावरे (गाई- म्हशी )टाकत आहे ही जनावरे टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे त्याचा त्रास येणारा जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे तसेच या रस्त्याने प्रवास करणारे , येणारे जाणारे लोक दारू पिणारे हेही तिथेच दारू पिऊन बाटल्या टाकत आहे त्याचप्रमाणे जुने कपडे, प्लास्टिक बिसलरी बाटल्या, दारूच्या बाटल्या ,चार चाकी गाड्यांच्या काचा, टँकर मधील केमिकल व खराब झालेला भाजीपाला, यामुळे या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे या वनविभागाच्या जागेच्या खालील बाजूसच बंधारा आहे या सगळ्या वस्तू त्या बंधाऱ्यात वाहून जातात आणि त्याच बंधाऱ्यांमध्ये तुळसण गावातील जनावरे पाणी पितात त्यामुळे जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे मेलेली जनावरे तशीच कुजून ते बंधाऱ्यात जात असल्यामुळे त्या पाण्याला दुर्गंधी येते त्याचा परिणाम इतर जनावरांच्या आरोग्यावर होणार आहे याबाबत संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कल्पना देऊन सुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत आहेत तसेच वनविभागाच्या हेल्पलाइनला फोन करून सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली नाही तरी वनविभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी. अशी मागणी तुळसण ग्रामस्थांनी केली आहे .
कोळे तुळसण हद्दीत दुर्गंधी होणाऱ्या वस्तू,मेलेली जनावरे टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी;तुळसण ग्रामस्थांची वन विभागाकडे मागणी
RELATED ARTICLES