ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

ज्ञानोबाच्या पालखी समोर वारकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी :  आषाढी एकादशी संपवून परतीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मोठा गोंधळ उडाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथापाठी असलेल्या वारकऱ्यांना पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकरी आक्रमक झाले. यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत पालखी समोर ठिय्या मांडला.

आज ज्ञानोबांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये आगमन झाले. या परतीच्या प्रवासात पुरंदर तालुक्यातील निरा येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना निरास्नान घातले जाते. हे निरास्नान झाल्यानंतर रथाच्या पुढे आणि पाठीमागे ज्या दिंड्या असतात त्या दिंड्यातील वारकरी दर्शनासाठी पादुका दिंड्यापर्यंत घेऊन जातात. मात्र, यावर्षी निरास्नान झाल्यानंतर फक्त रथाच्या पुढे पादुका दर्शनासाठी नेण्यात आल्या, रथाच्या पाठीमागे पादुका येणार नसून वारकऱ्यांनी रथाजवळ येऊन दर्शन करावे असे सांगण्यात आल्यानंतर वारकरी आक्रमक झाले. यावेळी संतप्त वारकऱ्यांनी पालखी पुढेच पुढे ठिय्या मांडला. परंपरा मोडीत काढू नका अशी मागणी वारकऱ्यांनी केली.

Scroll to Top