ताज्या बातम्या

रानकोळ बोडणपाडा येथे मेगा नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न; १०० गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार

मुंबई (शांताराम गुडेकर ) : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231-A1 अंतर्गत लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रॉन आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच समता संस्कार सेवा फाउंडेशन, जोहार नवरात्र उत्सव मंडळ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, ऐना यांच्या सहकार्याने रानकोळ बोडणपाडा येथे भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.
विठ्ठल सुतार मैदान, बोडणपाडा, वाणगाव-चारोटी मुख्य रस्ता येथे सकाळी ९ वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात झाली,या शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे १०० गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच गरजूंना अत्यंत कमी किमतीत चष्मे आणि श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले.या प्रकल्पासाठी माजी एमसीसी (MCC) डॉ. ख्वाजा मुदस्सिर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, आयपीएलएम (IPLM) अध्यक्ष लायन अक्षय लाडगे,गावच्या सरपंच सौ. वनिता सिकिन कर्मोडा आणि उपसरपंच श्री. मूलचंद बोलाडा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी डीसी स्पोर्ट्स (DC Sports) लायन मोहन वायदंडे, माजी अध्यक्ष लायन उमेश कोंडवस्कर आणि लायन विनोद वायदंडे हे देखील उपस्थित होते. सफ्रॉन क्लबचे अध्यक्ष लायन जितेंद्र सकपाळ यांनी सर्व मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे मनापासून स्वागत केले. प्रकल्पाचे समन्वयक आणि जीएलटी (GLT) समन्वयक लायन विजय रायमाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. क्लबचे सचिव लायन संजू ससमल यांनी आभार प्रदर्शन केले. हा ‘मेघा’ (MEGHA) प्रकल्प ‘समता संस्कार फाउंडेशन’ आणि ‘जोहार नवरात्र उत्सव मंडळ, सिकिन कर्मोडा’ यांच्या सहकार्याने राबवण्यात आला.यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. नेत्र तपासणी करून मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांची पुढील मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रॉनच्या टीम सॅफ्रॉनचे विशेष परिश्रम लाभले,समता संस्कारसेवा फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा पिंकी पाटील, रंजिता जैन,जोहार नवरात्र उत्सव मंडळ रणकोळ चे सचिव श्री.सिकिन करमोडा , उपाध्यक्ष प्रवीण गडग कार्याध्यक्ष श्री नितीन करमोडा खजिनदार मंगेश सुतार व मंडळातील सर्व सदस्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, ग्रुप ग्रामपंचायत आणि स्थानिक मंडळांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

Scroll to Top