ताज्या बातम्या

सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे रिपब्लिकन नेतृत्व- अण्णा वायदंडे

वाशी(अजित जगताप) : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील दलित- पददलित समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला. हाच विचार सोबत घेऊन सर्व जाती धर्माच्या नेतृत्व करणारे रिपब्लिकन नेते आदरणीय रामदास आठवले आहेत. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे महासचिव व मातंग आघाडी प्रदेशाध्यक्ष श्री अण्णा वायदंडे यांनी वाशी येथे केले.

रिपब्लिकन पक्ष( मंत्री आठवले) यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाच्या ६९ वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित पब्लिकन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महिला आघाडी प्रमुख सौ सीमाताई आठवले, रिपब्लिकन पक्ष प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सिद्धार्थ कासारे, मुबारक शेख, शहाजी कांबळे, अशोक बापू गायकवाड, विशाल कांबळे, बापू कागदे, राजेंद्र मोरे, सुनील तांबे, जगदीश साळवी, विजय खरात, सुनील माने, प्रदीप गडकरी, संजय तुपे, दिलीप साठे, राजेंद्र कांबळे, जगन्नाथ बनसोडे, राजेंद्र जगताप, यांच्यासह सह संपूर्ण भारतातून आलेल्या अनेक मान्यवरांनी रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत रोहिदास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर भारतातील सर्व जाती धर्मातील समाजासाठी रिपब्लिकन नेते आठवले हे प्रामाणिकपणाने काम करीत आहे. सत्तेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत आहेत. पॅंथरचा लढाऊ नेता आज सर्व दलित पददलित समाजाच्या प्रश्नासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करत आहेत.
यामध्ये कोणताही भेदभाव न करता समाजाचे प्रश्न सोडवण्याचे ते काम करत आहे. त्यामुळे मातंग समाजासोबत सर्व समाज त्यांचे नेतृत्व मानत आहे. असे स्पष्ट करून श्री अण्णा वायदंडे म्हणाले, मा. आठवले साहेब हे अहोरात्र समाजासाठी काम करत आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना स्वतःचे हक्क हवे असतात. यासाठी रस्त्यावर आंदोलन करावे लागते. लढावे लागते. सार्वत्रिक निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांसाठी मेजवानी असे न समजता पक्षासाठी आपण झटले पाहिजे. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे असे त्यांनी स्पष्ट केले. या वर्धापन दिनानिमित्त भारतातून आलेल्या प्रतिनिधींनी चांगल्या पद्धतीने आपले विचार व्यक्त केले. रिपब्लिकन पक्ष म्हणजे कोणत्याही जाती धर्माचा पक्ष नसून सर्वांचा हा पक्ष आहे. या पक्षासाठी जे झटले. त्यांना रामदास आठवले यांनी भरपूर दिले आहे. देशपातळीवर आठवले यांचे नेतृत्व तडपेने काम करत आहे. याचा मी साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळेला मातंग आघाडीचे अनेक कार्यकर्त्यांसोबत सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीबद्दल त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

फोटो– वाशी येथे रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित नेते व कार्यकर्ते (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top