ताज्या बातम्या

चंदगडचे सुपुत्र मा.श्री सचिन सदानंद बल्लाळ यांना अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टरेक्ट (सोशल वर्क आणि सोशल वेल्फेअर) पदवी प्रदान

मुंबई (शांताराम गुडेकर ) : ग्लोबल पीस कौन्सिल,इंटरनॅशनल ह्युमन राइट्स ॲम्बेसेडर ऑर्गनायझेशन, जागतिक मानवतावादी दिन (World Humanitarian Day) | लंडन हेराल्ड मॅगझिन आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स, नेल्सन मंडेला ग्रेट इंडियन पार्लमेंट अवॉर्ड,नोबेल पीस अवॉर्ड २०२६ तसेच भारत गौरव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा सोमवार दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर, १०१३, टिळक रोड, दाडावाडी, शुक्रवार पेठ, पुणे, महाराष्ट्र ४११००२ येथे डॉ. अविनाश डी. सकुंडे ( अध्यक्ष – सेंट्रल एज्युकेशनल डेव्हलपमेंट पार्लमेंट कमिटी,आंतरराष्ट्रीय अध्यक्ष – इंटरनॅशनल ह्युमन राइट्स ॲम्बेसेडर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष – ग्लोबल पीस कौन्सिल )यांच्यातर्फे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान पुरस्कार वितरण सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
या पुरस्कार सोहळ्यात चंदगडचे सुपुत्र, मा. जिल्हा परिषद सदस्य मा.श्री सचिन सदानंद बल्लाळ यांना अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टरेक्ट (सोशल वर्क आणि सोशल वेल्फेअर) ही पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ.श्री सचिन सदानंद बल्लाळ यांना या यशाबद्दल आणि त्यांना मिळालेल्या अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टरेक्ट (सोशल वर्क आणि सोशल वेल्फेअर) ही पदवी मुळे अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.

Scroll to Top