ताज्या बातम्या

ब्रिजेश दादा शुक्ला (पेंडा) याच्या माध्यमातून रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न सलग तिसऱ्या वर्षी महिलांचा अप्रतिम प्रतिसाद

मुंबई (दीपक मांडवकर /शांताराम गुडेकर ) :
नालासोपारा प्रभाग ९ मधील सातत्याने जनतेसाठी आणि विभागाच्या विकासासाठी प्रमुख सहकार्य करणारे विभागातील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते समाजसेवक श्री.ब्रिजेश दादा शुक्ला (पेंडा) यांच्या माध्यमातून प्रभाग ९ मध्ये रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सातत्याने सलग तीन वर्ष हा उपक्रम राबवत असताना विभागातील महिलांच्या प्रथमतः सुरक्षेचा विषय असता या महिलांसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहून प्रत्येक महिलांच्या संकटामध्ये प्रसंगामध्ये धावून जाणार हे उद्दिष्ट मनाशी बाळगून प्रत्येकाला सहकार्याची भावना निर्माण ठेवण्यात आली. आणि म्हणून याच भावनेने रक्षाबंधनाचा एक बहिण भावाचे ऋणानुबंध जोडले गेले आणि कार्यक्रम संपन्न होत असताना, या कार्यक्रमाच्या क्षणी बहुजन विकास आघाडीचे माजी युवा आमदार श्री. क्षितीज ठाकुरजी माजी नगरसेवक भरतजी मकवाना, धर्मेश भाई, येस बी सिंगजी, श्री. भानसेजी, नगरसेविका सौ. सुमन ताई काकडे आणि विभागातील कार्यकर्ते यांच्या उपस्थिती लावली बहुसंख्येने महिला मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. किमान ३०० पेक्षा जास्त महिला आजच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास सहभागी झाल्या होत्या तर प्रत्येकाने माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि सर्व सभासदांच्या हातात राखी बांधून रक्षाबंधन एक सुरक्षेचा धागा, एक विश्वासाचा धागा भावाच्या मनगटात बांधून आपलं प्रेम व्यक्त केलं. तर काही महिलांच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंद पाहायला मिळत होता. अशा रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे चर्चा संपूर्ण नालासोपारा परिसरामध्ये होत असून महिलांच्या वतीने ब्रिजेश दादा शुक्ला यांना यांचे आभार मानण्यात आले. आणि उपस्थित महिला भगिनींचे श्री. ब्रिजेश दादा शुक्ला यांच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानण्यात आले.

Scroll to Top