सातारा(अजित जगताप) : कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी परिश्रम घेणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिवस २१ ऑगस्ट हा “जलसंधारण दिन” म्हणून राज्यात साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने जलसंधारण जनजागृती व स्पर्धात्मक कार्यक्रम मोहीम राबवण्यात येणार आहे. अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अभियंता अरुण कुमार दिलपाक यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मृदसंधारण व जलसंधारण हे शेती, माती आणि पाणी हे नैसर्गिक संसाधने एकमेकांवर अवलंबून आहे . त्यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबतची जागरुकता वाढवणे व महत्व पटवून देणे आवश्यक आहे. म्हणूनच राज्यात “जलसंधारण दिन” साजरा करताना राज्यातील युवा पिढीचा सहभाग वाढविण्याकरीता सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
शनिवार दि.१५ ऑगस्ट २०२६ ते शुक्रवार दि.२१ ऑगस्ट २०२६ दरम्यान “जलसंधारण सप्ताह” तसेच
• दि.१५ ऑगस्ट २०२६ ते दि. २६ जानेवारी २०२७ दरम्यान “जलसंधारण अभियान” होत आहे. जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्यासाठी “वॉक फॉर वॉटर – महावॉकेथॉन” शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६.०० वाजता सातारा शहरातील राजवाडा ते शिवतीर्थ, सातारा या मार्गावर होणार आहे. महावॉकेथॉनमध्ये प्रथम पाच विजेत्यास सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
• या उपक्रमाची घोषवाक्य “पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा.” असे आहे.
•उच्चपदस्थ व वरिष्ठ तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी , अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती, सर्व महाविदयालयीन व शालेय विद्यार्थी आणि वय १५ वर्षे व त्यावरील सर्व पुरुष व महिला इत्यादींच्या सहभाग अपेक्षित आहे
• सदर कार्यक्रमासाठी २१ ऑगस्ट रोजी महावॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी QR / लिंक – https://register.mahaevent.co.in/ आधारित online नोंदणी आवश्यक असून सहभागी व्यक्तीस ई प्रमाणपत्र, टी शर्ट, कॅप व मी जलदूत बॅज देण्यात येणार आहे. इंस्टाग्राम च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी रील फॉर सोईल अंड वॉटर कन्सरशन ” स्पर्धा जलसंधारण सप्ताह दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
• यासाठी सोशल मिडिया वर #SaveSoilSaveWater हॅशटॅग वापरण्यात यावे. रीळ संभाव्य माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपारीक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य इत्यादी विषय असावेत.
• रील्स प्रचारासाठी मुख्य संदेश – “एक Reel… मातीसाठी!. एक Reel… पाण्यासाठी!. एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी!.”जिल्हास्तरावर महाराष्ट्र युवा जलदूत या नावाने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रकासह खालील ३ पुरस्कार २१ ऑगस्ट रोजी देण्यात येतील.
o प्रथम पुरस्कार – रु २५०००/-
o द्वितीय पुरस्कार – रु १५०००/-
o तृतीय पुरस्कार – रु १००००/-
o उत्कृष्ट सहभागींना – ई प्रमाणपत्र.
• उक्त नमूद स्पर्धांसोबतच १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी या जलसंधारण अभियान दरम्यान आपल्या जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये खालील कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचीन्ह देण्यात येणार आहे.
a) निबंध स्पर्धा जलसंधारणाचे महत्व, पाण्याचे महत्त्व, जल है तो कल है, जलसंवर्धन उपाय, घरातील
पाण्याचा वापर –
b)चित्रकलापोस्टर स्पर्धा, जलसंवर्धन उपाय, पाणी बचत उपाय, पावसाच्या पाण्याचे नियोजन
c) वाद-विवाद स्पर्धा विषय -जलसंधारण शासनाची जबाबदारी की जनतेची जबाबदारी, इतर
d) एक शाळा, एक शोषखड्डा उपक्रम राबविणे
e) सर्व शाळांमध्ये पाणी बचतीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगणे.
f) जलमित्र जलदूत घोषित करणे.
g) २१ ऑगस्ट रोजी शाळेत मा. सुधाकरराव नाईक यांच्याप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणे,
h) २१ ऑगस्ट रोजी मृद व जलसंधारणाची शपथ घेणे (सोबत सादर)
i) २१ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र सन्मानचिन्ह पुरस्कार वितरण करणे,
j) २१ ऑगस्ट रोजी गावातील किंवा शहरातील जलतज्ञ/ प्रतिष्ठीत व्यक्ती यांस प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रित करणे इत्यादींचे आयोजन करण्यात यावे. अशी माहिती पत्रकारांना दिली.
——————————————-
चौकट– सातारा जिल्हा परिषदेने पाण्याच्या बचती बाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यातून अर्ध पाणी तसेच ठेवून काही यूट्यूबच्या पत्रकारांनी पाण्याची नासाडी केली. तर सामाजिक जाणीव असलेल्या पत्रकारांनी बाटली रिकामी करून पाण्याचे मोल जाणले . त्याची चांगलीच चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगू लागली आहे. .
_______________________________
फोटो. — सातारा जिल्हा परिषदेच्या जलसंवर्धन कार्यक्रमाची माहिती देताना मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)




