ताज्या बातम्या

कराड तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या अध्यक्षपदी सोमनाथ थोरात

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेची बैठक रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली. ग्रामरोजगार सहाय्यक श्री. जयवंत केशव माने (अंतवडी) यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
बैठकीत अध्यक्षपदी श्री. सोमनाथ शिवाजी थोरात, तर उपाध्यक्षपदी श्री. प्रताप आबासो भणगे (कराड दक्षिण) व श्री. सुभाष काशिनाथ वाघमारे (कराड उत्तर) यांची निवड करण्यात आली. सचिवपदी श्री. सुधीर रामचंद्र दीक्षित, खजिनदारपदी श्री. रामचंद्र शेवाळे, तर संघटकपदी श्री. सुरेश तातोबा शेवाळे (कराड दक्षिण) व सौ. साक्षी आकाश इंगवले यांची निवड झाली.
सल्लागारपदी श्री. जयवंत माने, श्री. निलेश पाटील, श्री. निवास खंडागळे, सौ. रोहिणी पिसाळ, श्री. रविंद्र तोडकर व श्री. शहानवाज मुल्ला यांची निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. विकास घोलप, श्री. निवृत्ती तडाके, श्री. तानाजी सावंत, श्री. रामचंद्र शेवाळे, श्री. सोमनाथ मोहिते, श्री. सागर जाधव, श्री. सुरज काटकर, श्री. लालासाहेब शिंदे व श्री. राजू सावंत यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस कराड तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित ग्रामरोजगार सहाय्यकांनी अभिनंदन करून संघटनेच्या माध्यमातून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Scroll to Top