ताज्या बातम्या

लोकमान्य टिळक यांच्या समाधी स्थानी झेंडावंदन ; २३ जुलै रोजी महापौर आणि आयुक्त करणार अभिवादन

मुंबई : “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !” अशी ब्रिटिश साम्राज्याला हादरविणारी घोषणा देणारे, स्वराज्याचे, असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची २३ जुलै रोजी जयंती असुन १ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी आहे. स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी ) येथे हे दोन्ही कार्यक्रम होणार असुन मुंबईच्या पहिल्या नागरिक महापौर श्रीमती रितु तावडे या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती दिनी व पुण्यतिथी दिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे पुष्पहार तसेच पुष्पचक्र अर्पण करुन झेंडावंदन करतील. ज्या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी राष्ट्र जागृती केली परंतु दुर्दैवाने त्यांना स्वातंत्र्य पाहता आले नाही. समस्त देशभक्तांच्या कृतज्ञता भावनेने हे झेंडावंदन होणार आहे. पाहुण्यांचे स्वागत स्थानिक नगरसेविका श्रीमती स्नेहल तेंडुलकर व स्मारक समिती तर्फे सकाळी ९.४५ वाजता करण्यात येणार असून लोकमान्य टिळकांची पगडी देऊन या पाहुण्यांचा बहुमान करणार आहेत. झेंडावंदन ठीक सकाळी दहा वाजता होणार आहे. गेली अठरा वर्षे या समाधी स्थान जागृतीसाठी अथक कार्य करणारे लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती या कार्यक्रमाचे आयोजन करीत असुन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त श्री जयराज फाटक यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे संस्थापक, अध्यक्ष प्रकाश सिलम यांनी दिली.

Scroll to Top