ताज्या बातम्या
तमाशा च्या फडातुन सांस्कृतिक प्रवास सुरु केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं आकस्मिक निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळालोककलेच्या नभांगणातील ‘मधुरंग’; लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर…! पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून मधुबाईंसोबत धरलेला फुगडीचा फेर!क्राफ्ट पेपरच्या दरात तीन महिन्यांत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; कोरुगेटेड बॉक्स उद्योग संकटात बॉक्स उत्पादकांची दरवाढ लागू करण्याची आणि पेपर मिल्सकडे दर स्थिर ठेवण्याची मागणीपर्यावरण संवर्धनासाठी ‘वसुंधरा पायी दिंडी’; १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान कराड तालुक्यातून मार्गक्रमणपुणे जिल्ह्याचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा’ करावे : डॉ. अविनाश सकुंडे

जखिनवाडी (कराड) येथून बौद्ध लेणीकडे जाणाऱ्या मार्गावरील पाजर तलावात कचऱ्याचे साम्राज्य; पाणी दूषित, प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील जखिनवाडी येथून बौद्ध लेणीकडे जाणाऱ्या मार्गावरील पाजर तलावात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने तलावाचे पाणी दूषित होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंमुळे तलावाचे सौंदर्यही नष्ट होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तलावात सातत्याने कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरत असून जलप्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. हा परिसर पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण असतानाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने तलावातील कचरा हटवून स्वच्छता मोहीम राबवावी, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच परिसरात जनजागृती करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास जलप्रदूषणासह पर्यावरणीय समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top